विवेक विद्यालयाचा रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : विक्रोळी येथील विवेक हायस्कूल, मुंबईच्या रौप्यमहोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचा उत्साहात समारोप झाला. या सोहळ्याचे समारंभाध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात, तर स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव विमल थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमास शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख, उद्योगपती मंगेश भोसले आणि प्रशासकीय अधिकारी किसन पावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मनीषा थोरात यांनी केले. याप्रसंगी एसएससी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा, वार्षिक क्रीडा महोत्सवातील विजेत्या संघाचा तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागातील आदर्श विद्यार्थी आणि उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा बहारदार आविष्कार सादर केला. शेतकरी नृत्य, लावणी, गोंधळ, वारी आणि देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचे कौतुक करत मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.