मुंबई

श्रीलंकेत भाग्यश्री वर्तक यांना ‘सोशल एक्सलन्स इंटरनॅशनल अवॉर्ड’

CD

श्रीलंकेत भाग्यश्री वर्तक यांना ‘सोशल एक्सलन्स इंटरनॅशनल अवॉर्ड’
३३ वर्षांच्या सेवाभावी कार्याचा आंतरराष्ट्रीय स्‍तरावर गौरव
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः कर्णबधिर, दिव्यांग व आदिवासी समाजासाठी गेली तीन दशके अहोरात्र कार्य करणाऱ्या भाग्यश्री राजेंद्र वर्तक यांना नुकताच सोशल एक्सलन्स इंटरनॅशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा श्रीलंका, कोलंबो येथील स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर हाय कमिशन ऑफ इंडिया येथे पार पडला. हा सन्मान म्हणजे त्यांच्या ३३ वर्षांच्या समर्पित सामाजिक, शैक्षणिक व दिव्यांग सक्षमीकरणाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील गौरव आहे. भाग्यश्री वर्तक या २०२४ मध्ये मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या असल्या तरी कर्णबधिर मुले व आदिवासी समाजासाठीचे त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे.
त्या ‘शुभ्रा प्रकल्प’ या उपक्रमाच्या संस्थापिका असून, आतापर्यंत त्यांनी शेकडो कर्णबधिर व आदिवासी व्यक्तींना खेळणी, टोप्या, वह्या, स्कूल बॅग, युनिफॉर्म व दिवाळी फराळ अशा स्वरूपात मदत केली आहे. दिव्यांगांचे सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती व सर्वसमावेशक शिक्षणासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठीही त्यांनी विशेष गीत लिहिले आहे. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा डी. एस. राठोड फाउंडेशन, मार्शल योगा अकॅडमी व सर्किट बेंच फाउंडेशन संचलित इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे भारत-श्रीलंका मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होत असून, भारतीय सेवाभावी कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याचे आयोजक सुरेश राठोड व डॉ. संजय गिरी यांनी नमूद केले.

दिव्यांग शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण
भाग्यश्री वर्तक यांनी टोटल कम्युनिकेशन पद्धतीद्वारे शेकडो दिव्यांग शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्या जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसबिलिटीज येथे अतिथी व्याख्याता म्हणूनही कार्य करतात. तसेच त्यांनी स्पेशल ऑलिंपिक भारतसाठी समन्वयक म्हणून काम केले असून, बौद्धिक अक्षम मुलांसाठी गीत व जिंगल तयार केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT