प्रदूषणाचे पर्यावरणावर आघात
तारापूर औद्योगिक क्षेत्रात झाडांची वाढ खुटंली
बोईसर, ता.१० (वार्ताहर): तारापूर औद्योगिक क्षेत्रात झाडांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. काही कारखानदारांकडून बेकायदा शेड उभारण्यासाठी झाडांची बेकायदेशीर कत्तल सुरू आहे. तर अनेक कारखान्यांच्या आवारातील झाडे प्रदूषणाने मृत अवस्थेत आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण केवळ स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीच्या झाडांसाठीही धोकादायक ठरत आहे. झाडांची संख्या कमी होत गेल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा वृक्षतोडीवर कठोर कारवाई करणे, प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे तसेच औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणीय समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------------------------------
पर्यावरणप्रेमींचा इशारा
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्याच्या आवारातील झाडे सुकलेली आहेत. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, कारखान्यातून निघणारे रासायनिक वायू, धूर किंवा दूषित सांडपाण्यामुळे झाडांमधील हरितद्रव्य नष्ट झाली आहेत. मातीची सुपीकता कमी झाल्याने झाडे हळूहळू सुकत आहेत. हा परिसरातील हवा, माती दूषित होत असल्याचा गंभीर इशारा असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.