शोषित, वंचितांचा इतिहास महत्त्वाचा
इतिहास संशोधक डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जीवनगौरव
विरार, ता. १०(बातमीदार)ः सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी स्थानिकांचे योगदान इतिहासात अधोरेखित करणे गरजेचे आहे. त्यामुळे शोषित, वंचितांचा इतिहास मांडणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. नारायण भोसले यांनी वसईतील कोकण इतिहास परिषदेत केले. या कार्यक्रमात इतिहास संशोधक डॉ. गो. बं.देगलूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय इतिहास विभाग, आय.क्यू.ए.सी यांच्या वतीने कोकण इतिहास परिषदेचे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. नारायण भोसले यांनी भूषवले, तर आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली होती. या वेळी कोकणाच्या इतिहासाचे महत्त्व पटवून देताना डॉ. नारायण भोसले कोकण अतिशय सूक्ष्म भूभाग आहे. जगाच्या नकाशावर त्याचे सुई इतकेही स्थान नाही, पण त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमात कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून इतिहास संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
--------------------------------------
‘वसईत जन्मल्याचा अभिमान’
विविधतेत एकता असा कोकणाचा भूभाग असून, एकता टिकवून ठेवायची आहे, असे मत आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी व्यक्त केले. तसेच मराठी भाषेची आज जी दशा झाली आहे, त्याचे फार वाईट वाटतं, पण ती टिकवण्यासाठी वसईतील अनेक नावं पुढे असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी वसईत जन्मल्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.