गारगई पुलावर जीवाला घोर
कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता
मोखाडा, ता.१० (बातमीदार)ः मोखाडा-खोडाळा-विहीगावराज्य महामार्गावर गारगाई नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. अशातच या पुलाचा कठडा तुटला असून अपघात होऊन जिवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मोखाडा, खोडाळा, विहिगाव हा राज्य महामार्ग, मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाला जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर गारगई नदीवर जुन्या स्वरूपाचा ब्रिटिश कालीन बांधणीचा पूल आहे. या मार्गावर वाहनांची रहदारी आहे. त्याचे संरचनात्मक परीक्षण झालेले नाही. जवळपास ३० मीटर लांब, २५ मीटर खोलीचा पूल अरुंद असल्याने दोन वाहने एकाच वेळेस जाऊ शकत नाही. .
----------------------
धोक्याचा प्रवास
जोगलवाडी येथील योगेश सारकते हा युवक वर्षभरापूर्वी २५ फूट खोल दरीत दुचाकीसह पडला होता. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला, मात्र, त्याच्या हाता पायाला डोक्याला, जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
--------------------------
या पुलाच्या संरचनात्मक परीक्षणासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. येथे नवीन पुल बांधण्यासाठी काम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच तुटलेल्या कठड्याचे काम दोन दिवसांत केले जाईल.
- विशाल अहिरराव, उप-अभियंता,मोखाडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.