भिवंडी भूमी अभिलेख कार्यालयात ‘मदत कक्ष’
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार; मोफत मार्गदर्शन उपलब्ध
भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयात जानेवारी २०२४ पासून ''ई-मोजणी व्हर्जन २.०'' ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे; मात्र ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी व नागरिकांकडून प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना तातडीने सहकार्य मिळावे यासाठी कार्यालयात आता विशेष ''मदत कक्ष'' स्थापन करण्यात आला आहे.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (पुणे) यांच्या आदेशानुसार, जमीन मोजणीचे अर्ज आता जुन्या ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. सर्व प्रक्रिया दिलेल्या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाइनच पूर्ण करावी लागणार आहे. मोजणी अर्ज दाखल करताना जमिनीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रक, संबंधित जमिनीचे जुने अभिलेख, बिनशेती मोजणीसाठी मंजूर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नियोजन प्राधिकरणाचे तात्पुरते मंजूर रेखांकन व ना हरकत दाखला, अर्जदाराचा ओळखीचा पुरावा, मोजणी शुल्काचे ऑनलाइन चलन (बँकेत भरून त्याची प्रत) इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अनेक नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया आणि पीडीएफ फाइल्स अपलोड करणे कठीण जात असल्याने, मदत कक्ष त्यांना अर्ज भरण्यापासून ते प्रकरण निकाली निघेपर्यंत सर्व टप्प्यांवर मोफत मार्गदर्शन करणार आहे.
संपर्क साधण्याचे आवाहन
तांत्रिक अडचणी किंवा मदतीसाठी नागरिकांनी मदत कक्षाच्या ९९६०५४४७९५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भिवंडीचे उपअधीक्षक भूमी अभिलेख सचिन हमजादे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.