कमळपाडा येथे इस्कॉनच्या वतीने पदयात्रा
पोयनाड, दि. १० (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील कमळपाडा येथे इस्कॉनच्या वतीने पदयात्रेचे काढण्यात आली होती. अलिबाग येथील श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर इस्कॉन नामहट्ट केंद्र यांच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पांडवादेवी फाटा येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. नवीन कमळपाडा, गणपती मंदिर येथून श्री शंकराचे मंदिर येथे हरे कृष्णा हरे कृष्णा, हरे राम हरे राम या गजराने वातावरण भक्तीमय झाले आहे. यानंतर ही पदयात्रा कमळपाडा गावातील श्रीराम मंदिर, शहाबाज गावातील श्री गणेश मंदिर परिसरातील सर्वच मंदिरांमध्ये गेली व शहाबाज येथे या इस्कॉनच्या पदयात्रेच्या समारोप झाला. या पदयात्रेला श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर इस्कॉन नामहट्ट केंद्र भक्तमंडळी, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र :
पोयनाड : कमळपाडा येथे इस्कॉनच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.