मुंबई

रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामावरून मनसे आक्रमक

CD

स्मशानभूमींच्या रखडलेल्या कामावरून संताप
ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मनसेची मागणी
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याणमधील बैलबाजार आणि लाल चौकी येथील स्मशानभूमींच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, निष्काळजी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बैलबाजार स्मशानभूमीच्या कामासाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी निविदा काढण्यात आली होती. कंत्राटानुसार हे काम ३०० दिवसांत पूर्ण होणे बंधनकारक होते; मात्र फेब्रुवारी २०२६ उजाडले तरी नवीन स्ट्रक्चरचे काम सुरू झालेले नाही. ठेकेदाराने केवळ जुने बांधकाम पाडून ठेवले असून, नवीन आराखड्याप्रमाणे कामाची एक वीटही रचली गेलेली नाही. यामुळे पावसाळ्यात आणि गर्दीच्या वेळी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई आणि डोंबिवलीच्या धर्तीवर या नवीन स्मशानभूमींमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी ‘एक्झॉस्ट फॅन’ आणि धूर उंचावर सोडण्याची आधुनिक यंत्रणा असणे अपेक्षित होते. मात्र, या कामाच्या मूळ टेंडरमध्ये अशा कोणत्याही तंत्रज्ञानाचा उल्लेख नसल्याने मनसेने प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आधुनिक सुविधेअभावी आजूबाजूच्या रहिवासी वस्तीला धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासनाला जाब विचारणार!
प्रशासनाचा ठेकेदारांवर कोणताही वचक उरलेला नाही, त्यामुळेच ही कामे रखडली आहेत, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले असून, लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT