मुंबई

रबाले टी जंक्शन मार्गातून अवजड वाहनांची घुसखोरी

CD

रबाळे टी जंक्शन मार्गातून अवजड वाहनांची घुसखोरी
अपघातांचा धोका वाढला
वाशी, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून रबाळे टी जंक्शन येथे भुयारी मार्ग उभारण्यात आला असला तरी या मार्गाचा गैरवापर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भीमनगर व कातकरी पाडा येथील रहिवाशांना ऐरोली परिसरात सुरक्षितपणे जाण्यासाठी हा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. मात्र सध्या एमआयडीसीतील अवजड वाहने शॉर्टकट म्हणून या मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रबाळे टी जंक्शन परिसरात वाहतूक कोंडीसह किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे.
विशेषतः झोपडपट्टी परिसरातून जाणाऱ्या या वाहनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई–एमआयडीसीदरम्यानची अवजड वाहने पटनी मार्गाने वळवावीत आणि भुयारी मार्गात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची तैनाती करावी, अशी आग्रही मागणी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली आहे.
कोट
रबाळे टी जंक्शन येथे भुयारी मार्ग हा रबाळे परिसरातील रहिवाशांना द्राविडी प्राणायम करीत ऐरोलीमध्ये प्रवास करावा लागत होता, त्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. पण आता या भुयारी मार्गातून एमआयडीसीकडे जाणारी अवजड वाहनेदेखील जात असल्यामुळे रबाळे टी जंक्शनजवळ वाहतूककोंडीदेखील होत आहे. त्यामुळे भुयारी मार्गातून अवजड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालावी.
सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नमुंमपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT