मुंबई

विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून दिला पर्यावरणाचा संदेश

CD

विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतून दिला पर्यावरणाचा संदेश
नेरूळ, ता. १० (बातमीदार) : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवनच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे आयोजित ‘हॅपी स्ट्रीट्स’ उपक्रमात पर्यावरण संरक्षण व वैश्विक पंचतत्त्वे या विषयांवर आधारित दोन प्रभावी नाटिका सादर केल्या. या सादरीकरणांना उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात फिटनेस, सामाजिक बांधिलकी व मैत्रीभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमात रोटेरियन सदस्य, त्यांचे कुटुंबीय व नवी मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय योग संस्थानच्या योग प्रात्यक्षिकांनंतर ब्लिस अकॅडमीच्या झुंबा सत्राने वातावरणात उत्साह निर्माण केला. टिसर आर्टिजन फोरम व स्क्रॅपजी यांनी पुनर्वापर व ई-वेस्ट व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली. डॉ. अंकिता सावंत यांनी फिजिओथेरपी व आरोग्यदायी जीवनशैलीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन रोटेरियन मोहन देशकर यांनी केले असून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT