कंत्राटी कामगारांचे प्रलंबित वेतनवाढ तातडीने लागू करण्याची मागणी
नेरूळ, ता. १० (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांची गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ तातडीने लागू करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने महापौर सुजाता पाटील यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार प्रामाणिक सेवा देत असतानाही त्यांच्या वेतनात अनेक वर्षांपासून वाढ झालेली नाही. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांना न्याय मिळावा, यासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी युनियनने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष संजय सुतार, उपाध्यक्ष अजय सुपेकर, तुषार कचरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेमध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक, उद्यान व इतर सर्व महत्त्वाच्या विभागांमध्ये कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावत आहेत. नवी मुंबई महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावर मिळालेले सर्वच पुरस्कार, स्वच्छता सर्वेक्षणातील मानांकन आणि शहराच्या प्रगतीमध्ये या कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा आहे. मात्र गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अनेक कामगार कंत्राटी पद्धतीनेच कार्यरत असून, त्यांच्या वेतनात कोणतीही भरघोस वाढ झालेली नाही.
चौकट
दैनंदिन गरजा भागवणे कठीण
गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी कामगारांची वेतनवाढ प्रलंबित असून, वाढती महागाई, घरखर्च, शिक्षण, आरोग्य व दैनंदिन गरजा भागवणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण झाले आहे. तरीही हे कामगार आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असून, महापालिकेच्या कार्यात मोलाचे योगदान देत आहेत. महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा विषय सातत्याने दुर्लक्षित राहिला असून, ही बाब कामगारांवर अन्याय करणारी ठरत आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वसाधारण सभेत कंत्राटी कामगारांच्या भरीव व न्याय्य वेतनवाढीसाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.