मुंबई

पनवेल महानगरपालिकेवर भाजप महायुतीची निर्विवाद सत्ता; नितीन पाटील महापौर, प्रमिला पाटील उपमहापौर बिनविरोध

CD

पनवेल महापालिकेवर महायुतीची सत्ता
भाजपचे नितीन पाटील महापौर, तर प्रमिला पाटील उपमहापौरपदी

पनवेल ता. १० (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची मंगळवारी (ता. १०) बिनविरोध निवड झाली. यामुळे आगरी समाजाचा पहिला महापौर होण्याचा मानही पाटील यांना मिळाला आहे. शेकाप महाविकास आघाडीकडे आवश्यक पक्षीय बलाबल नसल्याने त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. त्यामुळे भाजप महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिक ठरली.
महापौर, उपमहापौर निवडीसाठी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत भाजपने ५५, शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवत एकूण ५९ जागांसह महापालिकेवर पुन्हा एकदा भक्कम सत्ता प्रस्थापित केली. निवड प्रक्रिया पूर्ण होताच पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...........
महापौर नितीन पाटील यांचे पनवेलमधील कासारभाट हे मूळ गाव असून, सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश करीत त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. सभागृहातील विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे ते चर्चेतही राहिले आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असून, पनवेल विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रमुख म्हणून केलेले नियोजन पक्षाच्या यशात निर्णायक ठरले.
..................
उपमहापौर प्रमिला पाटील शिरढोण गावाच्या असून, भाजप कळंबोली मंडलच्या खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून प्रमिला पाटील यांनी विद्या गायकवाड यांचा पराभव करीत आपली ताकद सिद्ध केली. याची दखल घेत त्यांना उपमहापौरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
..............................
पनवेलकरांनी दिलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. शहराचा सर्वांगीण, संतुलित आणि दीर्घकालीन विकास साधताना पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील. पनवेलला स्मार्ट, स्वच्छ आणि समृद्ध शहर म्हणून पुढे नेण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.
- नितीन पाटील,
महापौर - पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT