‘नायर’मधील वसतिगृहाची दुरवस्था
एका खोलीत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी; प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : नायर दंत रुग्णालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्षभरापासून विद्यार्थी सातत्याने पाठपुरावा करत असले तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. नायर दंत रुग्णालय परिसरातील ११ मजली इमारतीत सात ते अकरावा मजला वसतिगृहासाठी वापरला जातो; मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून स्वच्छता न झाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित यांनी सांगितले की, ‘हाजीअली येथील वसतिगृहाचे काम पूर्ण झाल्यास ही समस्या सुटेल.’
नायर दंत महाविद्यालयात एकूण ३४४ विद्यार्थी असून, त्यापैकी २२५ विद्यार्थी नायर दंत वसतिगृहात, तर उर्वरित करी रोड येथील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये राहतात. सध्याची हॉस्टेलची क्षमता अपुरी ठरत आहे. एका खोलीत १० ते १५ विद्यार्थी राहत असून, नियमांनुसार ही संख्या तीन ते चार असणे अपेक्षित आहे. दुसरीकडे विद्यार्थिनींनी सांगितले की, ‘रात्री पॅसेजमध्ये उंदीर फिरतात आणि वाळत घातलेले कपडे कुरतडतात. नोव्हेंबरमध्ये हॉस्टेल मिळाले, तरी मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याचे विद्यार्थांनी सांगितले. झुरळांचा मोठा उपद्रव असून बेड व पंखे अस्वच्छ असून, १५,००० किमतीचे प्रॉस्थोडॉन्टिस्ट, ऑर्थो साहित्य रूममध्ये ठेवावे लागते, लॉकर नाहीत, स्वतंत्र स्टडी रूम नाही, एका खोलीत ८ ते १० विद्यार्थी असल्याने येथे अभ्यास अशक्य असल्याचे विद्यार्थांनी सांगितले.
पर्यायी व्यवस्था
हाजीअली परिसरातील जुनी इमारत पाडून या ठिकाणी २० ते २२ मजली नवे वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये निवास, स्वतंत्र मेस, लॉन्ड्री, वाचन कक्ष, इनडोअर खेळ, मनोरंजन कक्ष, योग-ध्यानाची सोय असून सुमारे ३५० विद्यार्थ्यांची व्यवस्था होण्याची शक्यता आहे, पण या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.