मुंबई

मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांची घोषणा आज

CD

महापौर, उपमहापौरांची आज घोषणा
मुंबई महापालिकेचे सभागृह सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर या पदांची औपचारिक निवड उद्या (ता. ११) होणार आहे. विरोधकांकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची थेट घोषणा होणार आहे. महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे, तर उपहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी पालिका मुख्यालयातील सभागृह सज्ज झाले आहे. पालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून २०१७पर्यंत सात महिला महापौर झाल्या आहेत. १९५५-५६मध्ये सुलोचना मोदी महिल्या महिला महापौर झाल्या होत्या. त्यानंतर १९९४-९५मध्ये काँग्रेसच्या ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर दुसऱ्या महिला महापौर झाल्या. १९९७ -९८ पासून २०२२ पर्यंत शिवसेनेच्या सलग पाच महिला महापौर झाल्या. आता भाजपने रितू तावडे यांना महापौरपदाची संधी दिली आहे. त्या भाजपच्या पहिल्या तर महापालिकेच्या इतिहासातील आठव्या महिला महापौर ठरणार आहेत. प्रथम महापौरपदाची आणि त्यानंतर उपमहापौरपदाची घोषणा पालिका सभागृहात करण्यात येईल. पालिका आयुक्त भूषण गगराणी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पालिकेचा चिटणीस विभाग निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणार आहे.
----------
शिवसेना ठाकरे पक्षाची भूमिका
पालिका सभागृहात उद्या होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार असून, आम्ही या निवडीला गालबोट लावणार नसल्याची माहिती शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली.
----
काँग्रेसचे नगरसेवक हजर राहणार
पालिका सभागृहात उद्या होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नगरसेवक हजर राहणार आहेत. मुंबईकरांना विवाद नको, विकास हवा आहे. म्हणून आमचे नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर सभागृहात आवाज उठवतील. बेस्टसह महापालिकेच्या विविध विभागांत खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. मुंबई विकण्याचे भाजप महायुतीचे मनसुबे आमचे नगरसेवक उधळून लावतील, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; 24 तासांत 21 मिमी सरासरी पाऊस, चार महसूल मंडळांत अतिवृष्टी

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

Pune Traffic jam: हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT