मुंबई

खुल्या मैदानाअभावी खेळांना ग्रहण

CD

खुल्या मैदानाअभावी खेळांना ग्रहण
नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनची बैठक

अंबरनाथ, ता. १० (वार्ताहर) : शहरात खेळाडूंना खुले मैदानच नसल्याने क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसारख्या मैदानी खेळांना मर्यादा आल्या आहेत. टर्फ व खासगी मैदानांवर मोठा खर्च करून बंदिस्त जागेत खेळावे लागत असल्याने खेळाडूंची कुचंबणा होत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले पाटील, शहर अभियंता राजेश तडवी, क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबरनाथ शहरात क्रिकेटप्रेमींची संख्या मोठी असून अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र शहरात खुले मैदान नसल्याची खंत व्यक्त करीत गेल्या वर्षभरापासून स्पर्धांचे आयोजन करणे अडचणीचे झाले आहे. यापूर्वी पश्चिमेकडील नेताजी मैदानात सामने होत असल्याचे क्रिकेटप्रेमींनी सांगितले. सध्या या मैदानावर पालिकेच्या माध्यमातून इंडोअर स्टेडियम, रनिंग ट्रॅक व विविध खेळांच्या सुविधांची उभारणी सुरू असल्याने क्रिकेटसाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे यंदा मार्च महिन्यात होणाऱ्या दोनदिवसीय स्पर्धेसाठी पालिकेच्या मालकीचे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, मैदान उपलब्ध झाले नाही तर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करू, असा इशारा अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी दिला. या मागणीला नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच खुले मैदान उपलब्ध करून देण्याचे निर्देश शहर अभियंता राजेश तडवी यांना दिले. तसेच नेताजी मैदानाची अधिकाऱ्यांसह पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट सांगितले. लवकरच नगराध्यक्ष चषकाचे आयोजन करू, अशी घोषणा नगराध्यक्षांनी केली.


मैदान नसल्याचा खेळाडूंना फटका

अंबरनाथ शहरात एकही खुले मैदान नसल्याचा फटका थेट खेळाडूंना बसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयएसपीएल स्पर्धेत अंबरनाथचा एकही खेळाडू दिसला नाही, तर भिवंडी, कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहरांतील तब्बल ४५ खेळाडू मैदानात उतरले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्षपद मिळणे ही अभिमानाची बाब असताना, अंबरनाथमध्ये खेळण्यासाठी मैदानच नसणे ही शहरासाठी अत्यंत दुर्दैवी व खेदजनक बाब असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.


मैदानाच्या दुरवस्थेविषयी चर्चा

बैठकीत शहरातील इतर मैदानांच्या दुरवस्थेविषयी व सोयी-सुविधांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिमेकडील चिंचपाडा खदानीजवळील मैदान व ग्रीन सिटी येथील मैदान नशेखोरांचे अड्डे बनले असून, रात्रीच्या वेळी अंधारामुळे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आणून देत येथे वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर ग्रीन सिटी येथील मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात कचरा आणि दुर्गंधी पसरते. त्यामुळे या मैदानात स्वच्छतेची मागणी करण्यात आली. खेळाडूंना प्रोत्साहनासाठी निधी येतो; मात्र तो प्रत्यक्ष खेळाडूंपर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला.

फोटो - 526

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT