व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला - डॉ. मिताली संचेती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की शिक्षण क्षेत्र, नियमित अभ्यास आणि मेहनत घेतली तरच परिस्थिती बदलते, असे मार्गदर्शन ठाणे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. मिताली संचेती यांनी नुकत्याच झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
ठाणे महापालिका व रोटरी क्लब आयोजित एसी, रेफ्रिजरेटर, वॉटर कूलर या उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नौपाडा येथील पालिका शाळा क्र. १९ येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्लू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका शाळा क्रमांक १९, विष्णूनगर, ठाणे (प.) येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ११ मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण असून ते मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी व व्यवसायसाठीदेखील रोटरीतर्फे सहकार्य केले जाते. या वेळी ठाणे महापालिकेच्या उपायुक्त मिताली संचेती यांनी पूर्ण सेंटरची पाहणी करून सर्व उपक्रमाची माहिती घेतली. त्या मनोगतात म्हणाल्या, की रोटरीने हा चालू केलेला हा एक अभिनव उपक्रम असून, याच्यात रोटरी विद्यार्थ्यांना पूर्णपणे अत्युच्च प्रतीच्या साधन सामुग्रीसह प्रशिक्षण देतच आहेत. तसेच त्यांनी त्यांना रोजगार निर्मितीचे पण साधन निर्माण करून दिलेले आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा, यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे डॉ. मिताली संचेती यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट ३१४२चे प्रांतपाल हर्ष माकोल होते. ठाणे महापालिकेचे शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ब्लू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.