सदनिका बक्षीसपत्राचा प्रश्न मार्गी लागणार
म्हाडाच्या लोकशाहीदिनात १० अर्जांवर सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : सर्वसामान्यांचे रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी सोमवारी झालेल्या म्हाडाच्या लोकशाहीदिनाच्या कार्यक्रमात सदनिका बक्षीसपत्रावर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले. त्यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.
दीप्ती दिलीप पितळे यांच्या सासूबाई रुक्मिणी दिनकर पितळे या मुंबई मंडळाच्या सोडतीत तुंगा पवई गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकेसाठी स्वातंत्र्यसैनिक प्रवर्गातून यशस्वी व पात्र अर्जदार ठरल्या. रुक्मिणी यांनी ही सदनिका नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे नातवाच्या नावे केली; परंतु बक्षीसपत्र म्हाडामध्ये सादर करण्यापूर्वी नातवाचे निधन झाले. त्यामुळे ही सदनिका दीप्ती पितळे व दिलीप पितळे यांच्या नावे हस्तांतरित करावी, या मागणीसाठी सोमवारी लोकशाही दिनात दीप्ती यांनी अर्ज केला होता. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सासूबाई रुक्मिणी पितळे हयात असल्याने नव्याने बक्षीसपत्र करून येत्या आठ दिवसांत सादर करण्याबाबत दीप्ती यांना सांगितले. नवे बक्षीसपत्र सादर केल्यानंतर त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या कार्यक्रमात एकूण १० अर्जांवर सुनावणी झाली आहे. त्यात मुंबई मंडळातील आठ, कोकण मंडळ आणि मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातील प्रत्येकी एक अर्ज होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.