मुंबई

महापालिकेच्या शाळेत साकारली महाराष्ट्राची लोकसंस्कृती

CD

महापालिकेच्या शाळेत साकारली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
मुंबई, ता. १८ : मुंबई पब्लिक स्कूल, एम. जी. क्रॉस रोड क्रमांक एक, कांदिवली (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महापालिका संचालित सीबीएसई शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात उत्साहात झाला. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ ही कार्यक्रमाची संकल्पना असून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे मनोहारी व प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी सुजाता खरे उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मनपा शाळांमधील विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. या वेळी मान्यवर म्हणून ममता राव, दीपिका पाटील तसेच अशफाक शाह यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्ये, लेझीम, नाट्यप्रयोग आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमास उपस्थित पालक व प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापक संदीपान घुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे झाला. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६) सुशील कोडलिंगे यांना प्रदान करण्यात आला, तर उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार इयत्ता सहावीतील विद्यार्थी देवांश नितीन बेलोसे यांना देऊन गौरविण्यात आले.‍ दरम्यान, मनपा सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रथमच इतक्या भव्य व प्रतिष्ठित मंचावर विनामूल्य आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने हा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांसाठी अभिमानास्पद ठरला. शिक्षण उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या पुढाकारामुळे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह उपलब्ध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FMCG Price: स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! साबणापासून बिस्किटांपर्यंत जीवनावश्यक वस्तू महाग होणार; किंमती किती वाढणार?

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

T20 World Cup मधून बाहेर गेलेच, पण ऑस्ट्रेलिया आता ऑलिम्पिकलाही मुकणार? न्यूझीलंड कागांरूंचा बिघडवणार खेळ

"शेवटच्या दिवशी मेघाने..." बिग बॉस मराठी पहिल्या सीझनच्या विनरविषयी आस्तादचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT