मुंबई

मुंबई तिहेरी बॉम्बस्फोट बॉम्बस्फोटप्रकरण

CD

तिहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी
आरोपीला १४ वर्षांनंतर जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील २०११ मधील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १०) दीर्घकाळ तुरुंगवास आणि खटल्याला विलंब झाल्याच्या कारणास्तव १४ वर्षांनी जामीन मंजूर केला.
अर्जदार नदीम अख्तर शेख एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात असून, नजीकच्या भविष्यात त्याविरुद्धचा खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर करताना नोंदविले. शेखला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या हमीदारांसह इतर अटींवर सुटका करण्याचे आदेश दिले. विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर शेखने जामिनाच्या मागणीसाठी मे २०२२मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबईत १३ जुलै २०११ला झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर कबुतरखाना येथे तीन स्फोट झाले होते. त्यात २७ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात तपास यंत्रणेने ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यूएपीए आणि मकोका संबंधित कलमांखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

SCROLL FOR NEXT