मुंबई

नवी मुंबईत पार्किंगचा बोजवारा

CD

नवी मुंबईत पार्किंगचा बोजवारा
प्रशासनाची उदासीनता, नागरिकांना डोकेदुखी
प्रशासनाला जाब विचारणार की बघ्याची भूमिका?
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नियोजनबद्ध शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत पार्किंगचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून, तो शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना, त्या तुलनेत आवश्यक पार्किंग सुविधा विकसित करण्यात महापालिका प्रशासन व सिडको अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे महापालिका आयुक्त आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत चालली आहे.
वाशी, तुर्भे, नेरूळसह शहरातील प्रमुख व्यापारी व रहिवासी भागांत पार्किंगची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा बेशिस्तपणे उभी असलेली वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असून, वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीची प्रशासनाला पूर्ण कल्पना असूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, सिडकोने तुंगा हॉटेलसमोर कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सार्वजनिक पार्किंग सुविधा आजही सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाही. उलट ही जागा जुन्या वाहनांचा कार बाजार चालवणाऱ्या एका खासगी व्यावसायिकाला भाड्याने दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सार्वजनिक हितासाठी असलेली जागा खासगी फायद्यासाठी वापरली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या समस्येत भर म्हणजे पार्किंगसाठी आरक्षित जागेवर थेट ‘फन फेअर’ लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिणामी वाहनचालकांना गाड्या उभ्या करण्यासाठी जागाच उपलब्ध नसून, मजबुरीने रस्त्यांच्या कडेला वाहने लावावी लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांचा मनस्ताप वाढत आहे.
चौकट
उपमहापौरांची भूमिका काय?
या पार्श्वभूमीवर महापालिका व सिडको अद्याप मौन का बाळगत आहेत, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. शहराच्या उपमहापौरांनी या गंभीर विषयावर ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तात्काळ सार्वजनिक पार्किंग सुविधा खुल्या न केल्यास आणि पार्किंगसाठी राखीव जागांचा गैरवापर थांबवला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिक व सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT