सीवूड्समधील पाळणाघर आठ वर्षांपासून बंद
माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्याकडून कायदेशीर नोटीस
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या महासभेने मंजूर केलेला सीवूड्स सेक्टर ४८ येथील पाळणाघर प्रकल्प अद्याप म्हणावा तसा कार्यान्वित न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामकाजी पालकांना दिलासा देण्यासाठी २०१८मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पासाठी २०२१मध्ये स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. बांधकाम, अंतर्गत सुविधा, रंगरंगोटी, सीसीटीव्ही इत्यादींसाठी लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला. मात्र जवळपास आठ वर्षे उलटूनही पाळणाघर सुरू झालेले नाही.
याप्रकरणी माजी नगरसेवक विशाल राजन डोळस यांनी महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या उपायुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये संविधानातील कलमांचा हवाला देत कामकाजी पालक व बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाळणाघर सुरू न करण्यामागील कारणे व खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
चौकट
न्यायालयीन कारवाईचा इशारा
पाळणाघर तातडीने सुरू न केल्यास आणि आतापर्यंत झालेल्या सार्वजनिक खर्चाचा तपशील जाहीर न केल्यास प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी दिला आहे. तसेच निधीच्या संभाव्य अपव्ययास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
फोटो ओळ - तुर्भे : सीवूड्स येथील प्रशस्त पाळणाघर अनेक वर्षे बंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.