सामाजिक न्याय विभागाविरुद्ध विद्यार्थ्यांचा एल्गार
वसतिगृह प्रवेश, निर्वाह भत्ता व भोजन कंत्राटाविरोधात चेंबूरमध्ये तीव्र उपोषण
चेंबूर, ता. १२ (बातमीदार) : शासकीय वसतिगृह योजनांमध्ये समान संधी, स्वतंत्र बजेट कायदा, सर्व रिक्त पदांवर तत्काळ नियुक्त्या तसेच भोजन कंत्राटी पद्धतीतील भ्रष्ट साखळी तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी चेंबूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
चेंबूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सहाय्यअंतर्गत मुली व मुलांसाठी वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मूलभूत हक्कांसाठी यापूर्वीही अनेक मोर्चे व आंदोलने केली असून, प्रशासनाला निवेदनेही सादर करण्यात आली आहेत. यानंतर प्रशासनाने अद्याप ठोस दखल न घेतल्याने विद्यार्थी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
विविध मागण्यांसाठी विद्यार्थी वसतिगृहाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्रचे प्रो. रोहित कांबळे यांनी प्रशासनाने तत्काळ मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यव्यापी आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त रवि किरण पाटील यांनी सांगितले, की काही विषय मंत्रालय स्तरावरील आहेत. माझ्या कार्यक्षेत्रातील विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन आणि उर्वरित विषय मंत्रालयाकडे पाठवण्यात येतील.
विद्यार्थ्यांच्या मागण्या
वसतिगृह प्रवेशातील ३० टक्के मर्यादा रद्द करणे, गुणवत्तेनुसार (मेरिटनुसार) प्रवेश देणे, आरक्षण धोरणातील विसंगती दूर करणे, स्वतंत्र बजेट कायदा लागू करणे, सर्व रिक्त पदांवर तत्काळ नियुक्त्या करणे, प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करणे, नवीन वसतिगृहे उभारणे, भोजन कंत्राट पद्धतीतील भ्रष्ट साखळी रद्द करणे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे, स्वाधार योजनेची मदत दुप्पट करणे, बेकायदा शुल्क वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करणे, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, बार्टी योजनांमध्ये समान संधी उपलब्ध करून देणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.