मुंबई

“तुमचे ते चंद्रपूर… आमचे ते डोंबिवली…”

CD

तुमचे ते चंद्रपूर, आमचे ते डोंबिवली
राजू पाटील यांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

डोंबिवली, ता. १२ ः चंद्रपूर महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी अनपेक्षितपणे एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या नव्या समीकरणाचा धागा पकडत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या, तर ठाकरे गटाला उपमहापौरपद मिळाले. कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे हे दोन पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत ही युती आकाराला आली आहे.

काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिला होता, तेव्हा संजय राऊत यांनी मनसेवर सत्तेसाठी लाचारी पत्करल्याची बोचरी टीका केली होती. आता चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाने थेट भाजपशीच हातमिळवणी केल्यावर राजू पाटील यांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ‘‘तुमचे ते चंद्रपूर... आमचे ते डोंबिवली... वाह रे वाह!’’ अशी मिश्कील पोस्ट करत पाटील यांनी, ‘तुम्ही केले तर ती मुत्सद्देगिरी आणि आम्ही केले तर ती गद्दारी कशी,’ असा अप्रत्यक्ष सवाल राऊतांना विचारला आहे.

बदललेली राजकीय समीकरणे
कल्याण-डोंबिवलीत सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटात आता चंद्रपूरच्या निमित्ताने नवा ‘कलगीतुरा’ रंगला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेसाठी पक्षांच्या वैचारिक भिंती कशा दुय्यम ठरतात, हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT