मुंबई

स्थायी समिती सदस्यांची उत्सुकता

CD

स्थायी समिती सदस्यांची उत्सुकता
वसई-विरार पालिकेची पहिली महासभा २० फेब्रुवारीला
विरार, ता. १२ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेची पहिली महासभा शुक्रवारी (ता. २०) होणार आहे. या महासभेत १६ समिती सदस्य निवडले जाणार असून बहुजन विकास आघाडीस भाजप गटनेत्यांकडून कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे.
वसई-विरार पालिकेच्या महापौर, उपमहापौर यांच्या निवडीनंतर आता विविध समिती सदस्यांच्या नियुक्तींकडे तसेच स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि सर्व विषय समिती सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, यासाठीची चर्चा राजकीय पक्षांमध्ये रंगली आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे काँगेसच्या एका उमेदवारासह ७१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार स्थायी समितीमध्ये १० सदस्यांना पाठवण्याची संधी असेल, तर भाजपचे सहा सदस्य या समितीत जाणार आहेत. समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार लागणार आहे.
----------------------------
कोणाची वर्णी लागणार?
पहिल्या महासभेत केवळ स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. स्थायी समिती सभापतिपद बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकाकडे राहणार, ही बाब स्पष्ट आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापौरपदावर अजीव पाटील आणि उपमहापौरपदावर मार्शल लोपिस यांना संधी दिली आहे. या वेळी स्थायी समिती सभापतिपद कोणाला देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Punishment: छ. संभाजी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांना अमानवी शिक्षा; रबरने केस बांधले अन्...

Pune Couple Friendly Park: जोडीदारासोबत एकांतात क्षण घालवायचे? पुण्यातील हे पार्क आहे बेस्ट!

३ बरगड्या फ्रॅक्चर झाल्या... 'पुन्हा साडे माडे ३'च्या सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत; निवेदितांनाही सांगितलं नाही कारण

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये!

Zakir Husain Hospital : झाकीर हुसेन रुग्णालयाची दैना! इमारत सुसज्ज, पण सोयी-सुविधांचा मात्र पत्ताच नाही

SCROLL FOR NEXT