मुंबई

अनधिकृत बांधकामांवर तोडगा

CD

उल्हासनगरच्या विकासाला पालकमंत्र्यांचे बळ
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या विकासाला नवे बळ देणारे महत्त्वाचे निर्णय ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उल्हासनगर पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी तब्बल २७५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता काही दिवसांत देणार असल्याची घोषणा केली. तसेच अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी नव्या एडीटीपीची नियुक्ती केली जाणार असून, शहरात डॉग शेल्टर होम उभारण्याचेही निर्देश देण्यात आले.
ठाण्यात पार पडलेल्या या बैठकीत उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध प्रश्न ठळकपणे मांडले. शहरातील प्रलंबित प्रकल्प, निधीअभावी रखडलेली कामे आणि नियमितीकरणाचा प्रश्न याकडे लक्ष वेधत त्यांनी पालकमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले. उल्हासनगर महापालिका मुख्यालयाची इमारत जुनी व अपुरी पडत असल्याने नवीन, सुसज्ज व आधुनिक प्रशासकीय इमारतीची गरज अधोरेखित करण्यात आली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शिंदे यांनी २७५ कोटी रुपयांच्या निधीस लवकरच प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस किसन कथोरे, संजय केळकर, महेश चौगुले, सुलभा गायकवाड, रईस शेख, शांताराम मोरे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव आणि उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरण
शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाचा मुद्दा बैठकीत विशेष गाजला. कुमार आयलानी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही उल्हासनगर महापालिकेकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याचे नमूद केले. आगामी बैठकीत नियमित करण्यात आलेल्या इमारतींची यादी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिले. तसेच नियमितीकरण प्रक्रिया गतीमान करण्यासाठी नव्या एडीटीपीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भटक्या श्वानांची संख्या
शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर डॉग शेल्टर होम उभारण्याची मागणी करण्यात आली. त्यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित सर्व आयुक्तांना आपल्या कार्यक्षेत्रात डॉग शेल्टर उभारण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

‘या’ केल्या मागण्या
बैठकीत मेट्रो-५ च्या टप्पा क्रमांक २ (भोईरवाडी-उल्हासनगर) प्रस्तावास मंजुरी, स्वतंत्र जलपुरवठा योजना, सॅटीस प्रकल्प, मध्यवर्ती रुग्णालयाचा विस्तार, एंटीलिया पर्यटन विकास, नवीन पोलिस ठाणे, क्रीडा संकुल, म्हारळ-कांबा मार्गावरील प्रकाशयोजना, उल्हास नदी कंपाउंड वॉल यांसह अनेक विकासकामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याचाही मुद्दा मांडण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT