हौशी नाट्यप्रेमींसाठी आनंदवार्ता
मजेठिया नाट्यगृह सुरू होण्याच्या हालचाली, उपमहापौरांकडून पाहणी
वसई, ता.११(बातमीदार)ः वसई-विरार शहरातील हौशी नाट्यप्रेमींसाठी आचोळे येथे मजेठिया नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहातील उर्वरित कामे तातडीने करण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्यापर्यंतची नाट्यप्रेमींची पायपीट कायमची थांबणार आहे.
नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथे वसई विरार महापालिकेकडून मजेठिया नाट्यगृहाचे काम सुरु आहे. कोरोना आणि त्यानंतर प्रशासकीय काळात नाट्यगृहाचे काम रखडले होते. त्यामुळे नाट्य रसिकांकडून नाराजी होती. सद्यःस्थितीत पालिकेत लोकप्रतिनिधी असल्याने नाट्यगृह काम पूर्ण व्हावे यासाठी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या नाट्यगृहाच्या कामातील अडचणींची उप-महापौर मार्शल लोपीस यांनी पाहणी. यावेळी झालेल्या कामाचा ऑडिट रिपोर्ट सादर करून एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी, संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच नाट्यगृह खुले होईल, अशा आशा नाट्यप्रेमींमध्ये पल्लवित झाल्या आहेत. यावेळी माजी महापौर रुपेश जाधव, नगरसेवक अजित भोईर, परेश किणी, नगरसेविका प्रार्थना मोंडे, काजल गोपाळे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
खर्च - २ करोड ४३ लाख ५५ हजार ७२८
शिल्लक कामे - पडदा, कार्पेट, विद्युत रोषणाई, २६८ आसन व्यवस्था
-----------------------------
नाट्यगृहाची रखडलेल्या कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालिका अधिकारी, ठेकेदाराला केल्या आहेत. लवकरच नाट्यगृह खुले करण्याचा प्रयत्न आहे.
- मार्शल लोपीस, उपमहापौर, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.