मुंबई

शहापूरमध्ये नवोदय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

CD

शहापूरमध्ये नवोदय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा
सिंचन विभागाकडून भातसानगरची जमीन बिनशर्त मंजूर
शहापूर, ता. १२ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शहापूर तालुक्यात प्रस्तावित नवोदय विद्यालयासाठी भातसानगर येथील जमीन बिनशर्त मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून जल संपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली आहे.
गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक बुधवारी (ता.११) सिंचन भवन येथे पार पडली. या बैठकीत शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे प्रस्तावित नवोदय विद्यालयासाठी सिंचन विभागाकडून जमीन बिनशर्त मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित बोर्ड बैठकीत या निर्णयास अंतिम मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ व कल्याण तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जवळच नवोदय विद्यालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने महाजन यांची भेट घेऊन डावखरे यांनी त्यांचे आभार मानले.
यापूर्वी ठाणे व पालघर हे दोन्ही जिल्हे एकत्र असताना पालघर येथील नवोदय विद्यालयामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते. जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालयाची मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली होती. तर, निरंजन डावखरे यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. जिल्हा परिषदेचा ठराव, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि स्थानिक गरज लक्षात घेऊन २०२४ साली शासनाने ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय स्थापनेस मंजुरी दिली. आता भातसानगर येथील जमीनीसाठी अंतिम मंजुरी मिळाल्याने नवोदय विद्यालयाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहापूर व संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी हा निर्णय शैक्षणिक विकासाचा मैलाचा दगड ठरणार असून, विद्यालय उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी यापुढे प्रशासनाशी समन्वय ठेवून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आमदार डावखरे यांनी सांगितले.

शिक्षण गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचावी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संधी मिळाव्यात हा सातत्याचा ध्यास आहे. शहापूरमधील नवोदय विद्यालय हा त्या दिशेने टाकलेला ठोस आणि दूरगामी परिणाम करणारा टप्पा आहे. शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजना विद्यार्थ्यांच्या हिताच्या ठरत आहेत, असे निरंजन डावखरे यांनी म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT