मुंबई

पालिकेच्या अपयशावर नागरिकांचा झाडू!

CD

पालिकेच्या अपयशावर नागरिकांचा झाडू
अंबरनाथमध्ये लोकसहभागातून ‘नॅचरल क्लीनअप’
अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) ः अंबरनाथ शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. त्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढत असताना अखेर नागरिकांनीच रस्त्यावर उतरून थेट ‘नॅचरल क्लीनअप’ हाती घेतला. मंगळवारी (ता. १२) रात्री प्रभाग १९ मध्ये लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे पालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अंबरनाथ पूर्व येथील श्री कृष्णा हॉटेल, शिवधाम येथून या मोहिमेला नगरसेवक निखिल चौधरी यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली. स्टेशन परिसरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे चौक आणि अंतर्गत गल्ल्यांमधील साचलेला कचरा, पालापाचोळा आणि रस्त्याकडेला पडलेले डेब्रिज नागरिकांच्या सहकार्याने पूर्णतः हटविण्यात आले. विशेष म्हणजे ही मोहीम रात्रभर चालली, त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा न होता सकाळी नागरिकांना स्वच्छ रस्त्यांचे दर्शन घडले.
या मोहिमेत हिप्परगीकर, राव, अजिंक्य पाटील, जोथी राव, शुभ छेडा, बलदेव जाधव, निलेश बोर्से, निलेश पाताडे, जितू माळी, गौरव कुंभार, सुनील नायर, ओंकार वागळे, राज जाधव, तीन शाह व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शहर स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रशासनानेही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. लोकसहभागातून अशा मोहिमा राबवल्यास स्वच्छतेची संस्कृती रुजेल. यापुढेही असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे नगरसेवक निखिल सुनील चौधरी यांनी सांगितले.

आपला प्रभाग-सुंदर प्रभाग
एकिकडे पालिका प्रशासनाकडून सत्यत्याने स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या तरुणांसह सुजाण नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झालेले पाहायला मिळाले. आपला प्रभाग-सुंदर प्रभाग ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवत नागरिकांनी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर सामूहिक जबाबदारी असल्याचा ठाम संदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT