मुंबई

जनता विद्यालयाचा जलसंधारण उपक्रम;

CD

जनता विद्यालयाचा जलसंधारण उपक्रम
श्रमदानातून विद्यार्थ्यांनी बांधला पिंपळेश्वर मठाजवळ वनराई बंधारा
टोकावडे, ता. १२(बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई येथे पर्यावरण संवर्धन व जलसंधारणाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे. या विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानातून पिंपळेश्वर मठाजवळ वनराई बंधारा बांधण्यात आला.
उन्हाळ्यात परिसरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वन्य जीवांनाही पाण्याची उपलब्धता होणार आहे. जलसंधारणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
या श्रमदानात ११ वी व नववीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यालयातील शिक्षक नितीन शिंदे, संतोष महाजन, गजानन रोंगटे, जगदीश पोगेरे, बाळकृष्ण गगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला. या उपक्रमाचे नियोजन व संकल्पना विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

Vaibhav Sooryavanshi चे भारतीय संघात पदार्पण म्हणजे, संजू सॅमसन-सूर्यकुमार यादव यांच्यासाठी Bad News? रिपोर्टने उडवलीय झोप

Gold Investment: अक्षय तृतीयेला सोने घ्यायचंय? दागिने, डिजिटल, बार की ETF! खरा फायदा कुठे? चुकीचा पर्याय पडेल महागात

IPL 2026: रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, पण मग मुंबई इंडियन्ससाठी ओपनिंग करणार कोण? या खेळाडूंचा पर्याय

SCROLL FOR NEXT