मुंबई

मध्यस्थी महागात पडली!

CD

मध्यस्थी महागात पडली!
दुकानासमोरील वाद सोडवताना हल्ला; दोन जखमी, दोन आरोपी अटकेत
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : दुकानासमोरील किरकोळ वाद मिटवण्यासाठी पुढे सरसावलेल्या दुकान मालकावरच चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुर्ला कॅम्प चौकात मंगळवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या ही घटना घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उफचार सुरु आहेत. तर, याप्रकरणी यामुळे हिललाईन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलू आवळा यांचे उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील कुर्ला कॅम्प चौकात दुकान आहे. रात्री त्यांचे कामगार दुकान बंद करून साफसफाई करत होते. दुकानासमोर आरोपी पुजारी आणि करण नामक तरुणांमध्ये आपापसात वाद सुरू होता. वाद वाढल्याचे पाहून बबलू आवळा यांनी मध्यस्थी करत संबंधितांना भांडण थांबवून पुढे जाण्यास सांगितले. मात्र, आरोपींनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून बबलू आवळा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि राहुल चव्हाण यांच्यावर चाकू, खुर्ची आणि हातातील लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले.
या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेमुळे कुर्ला कॅम्प चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT