ढवळेपाडा-वांगणी परिसरात बसवले गतिरोधक
‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम ः एका दिवसात काम पूर्ण
बदलापूर, ता. १२ (बातमीदार) ः ढवळेपाडा, ढवळेगाव, वांगणी व डोणे परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत ‘सकाळ’ वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या भागात डांबरी गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व उपविभाग उल्हासनगर यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरू झालेले हे काम सलग सुरू ठेवून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व उपविभाग उल्हासनगरच्या अभियंत्यांच्या समन्वयातून कमी कालावधीत ही कामगिरी पूर्ण करण्यात आली. गतिरोधक बसविल्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी वाहनांचा वेग कमी होऊन नागरिकांची सुरक्षितता वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयेश केवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून सुरू झालेले काम संपूर्ण दिवस चालू ठेवत रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या कामाबद्दल मनसेच्या वतीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.