मुंबई

करथकबाकीवर महापालिकेचा ‘धडक’

CD

जी. आर. पाटील कॉलेजचे कार्यालय सील
एक कोटी २८ लाखांचा कर थकवल्याने पालिकेची कारवाई; परीक्षा काळात मुख्याध्यापक कक्षाला ठोकले टाळे

टिटवाळा, ता. १२ (वार्ताहर) कल्याण-डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) मालमत्ता करवसुलीसाठी छेडलेल्या मोहिमेत टिटवाळ्यातील नामांकित जी. आर. पाटील माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक कोटी २८ लाख रुपयांचा कर प्रलंबित असल्याने पालिकेने थेट शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. ऐन परीक्षा काळात झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागल्याची भावना व्यक्त होत आहे.

मालमत्ता कर उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक जयराम शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. शाळा व्यवस्थापनाने केवळ विश्वस्तांचे कार्यालय सील करण्याची विनंती केली होती; मात्र प्रशासनाने ती फेटाळून लावत मुख्य प्रशासकीय विभाग आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. सील केलेल्या कार्यालयांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, शैक्षणिक नोंदी आणि महत्त्वाची कागदपत्रे आहेत. सध्या शाळेत तोंडी परीक्षा सुरू असून, अशा संवेदनशील काळात झालेल्या कारवाईमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शाळेत ५५० हून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.

प्रशासनाची भूमिका स्पष्ट
मालमत्ता कराची कोट्यवधींची थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित आहे. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने ही कठोर पावले उचलावी लागली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊनच प्रक्रिया पार पाडली आहे, असे पालिकेच्या कर विभागाने स्पष्ट केले.

थकबाकीदारांचे धाबे दणाणले
महापालिकेने या आर्थिक वर्षात करवसुलीचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून, हजारो कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी जप्ती आणि लिलावाचा इशारा दिला आहे. शिक्षण संस्थाही या कारवाईतून सुटणार नाहीत, असा सज्जड दमच यानिमित्ताने प्रशासनाने दिला आहे. आता शाळा व्यवस्थापन तातडीने कर भरून विद्यार्थ्यांची अडचण दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT