सुधागड कॉलेजचा ‘सप्तरंग’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांचा रंगतदार कलाविष्कार
पनवेल, ता. १२ (बातमीदार) : सुधागड कॉलेजमध्ये सोमवारी (ता. १०) सायंकाळी ‘सप्तरंग’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचा उत्साहात समारोप झाला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास नवी मुंबई येथील सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार सुजित गायकवाड तसेच कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रंजीत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी सोनल कदम यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक रंजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, परिश्रम आणि प्रामाणिकपणा हे यशस्वी आयुष्याचे मूलभूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले. स्वतः सुधागड संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉलेजच्या प्राचार्या प्रा. डॉ. प्रिती महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश जाधवर यांनी स्नेहसंमेलनाच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पटेल महेक बादशाह (कला शाखा), मार्कड पूजा हनुमंत (वाणिज्य शाखा) आणि सावंत यश विकास (विज्ञान शाखा) यांनी मनोगत व्यक्त करत कॉलेजच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्यछटा, समूहगीत आदी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.