मुंबई

व्हॅलेंटाईननिमित्त गुलाबांना चढला भाव!

CD

बेलापूर, ता. १२ (बातमीदार) : प्रेमाचा आठवडा म्हणून सर्वत्र व्हॅलेंटाइन साजरा करण्यात येत आहे. अशातच शनिवारी (ता. १४) व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात येणार आहे. या प्रेमाच्या दिवशी गुलाबला सर्वाधिक मागणी असून जगभरातील तरुणाईची आपल्या प्रियजनांना गुलाबाचे फूल, तसेच इतर भेटवस्तू देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सर्व लहान-मोठ्या बाजारपेठा, फूलविक्रेते यांच्याकडे विक्रीसाठी असणाऱ्या विविध प्रकारच्या, रंगांच्या गुलाबाच्या किमती चांगल्याच वाढल्या असून दर वाढूनदेखील तरुणाईकडून खरेदी तेवढ्याच उत्साहात सुरू असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भारतात लोकांना जसे सोन्याचे आकर्षण आहे, तसेच फुलांच्या बाबतीत गुलाबांचे आहे. कोणताही सण, उत्सव, समारंभ असला, की फुलांमध्ये सर्वाधिक मागणी गुलाबाला असते. त्यात लाल गुलाब हे तर साक्षात प्रेमाचे प्रतीक! जसा फळांचा राजा आंबा हा चव आणि किमतीच्या बाबतीत आपला आब राखून आहे, तसेच गुलाबाचे आहे. आपल्या प्रियजनांसोबतची प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे, प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाब फुलांना व्हॅलेंटाइन दिवशी मोठ्या प्रमाणात मागणी असते. विविध शहरातून, देशातून विविध जातीची, आकाराची, रंगांची गुलाब फुले नवी मुंबईतील बाजारपेठेत दाखल झाली आहेत.

गुलाब पुष्पगुच्छाला पसंती
गुलाबाच्या विक्रीचा ट्रेंड हा काहीसा वेगळा असल्याचे व्यापारी सांगतात. लाल गुलाबाचा आकार, त्याचा ताजेपणा, कळीदार ते पूर्ण फुललेले फूल असेल तर एकाची किंमत किमान ३० रुपये; परंतु सहसा एक फूल विकण्यास व्यापारी उत्सुक नसतात. मध्यम आकाराच्या किमान चार फुलांचा पुष्पगुच्छ किमान २५० रुपयांपासून सुरू होताे. ही किंमत पुढे अधिक गुलाबांच्या गुच्छामुळे एक हजारांपर्यंत जाते. कारण फुलांच्या दर्जानुसार किंमत ठरते, असे विक्रेते रमेश पोयंजे यांनी सांगितले.

सध्याचे दर आधीचे दर
एक गुलाब ३० एक गुलाब २० ते २२
गुलाब गुच्छ ६०० गुलाब गुच्छ ४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT