पालिकेच्या कारवाईला विरोध भोवला
बोळिंज, ता. १४ (बातमीदार) ः नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार जाबरपाडा परिसरात बेकायदा बांधकामांवरील कारवाईत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर भूमाफियांनी हल्ला केला होता. याप्रकरणी ३०पेक्षा अधिक जणांवर पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेल्हार, जाबरपाडा भागातील २२ अनधिकृत व्यावसायिक गाळे, चाळी निष्कासित करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. भूमाफियांनी रस्त्यावर अवजड वाहने उभी करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला होता. या गोंधळामुळे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथक माघारी परतले; पण शासकीय कामात अडथळे निर्माण केल्याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून रकीब चौधरी, जावेद चौधरी, जावेद खान, धर्मेंद्र यादव, मोहम्मद मिट्टीवाला, पवन यादव, गौरव यादव, कल्लू यादव, शकील चौधरीसह २५ ते ३० जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.