बीच फेस्टिव्हल, सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन
पालघर, ता. १४ (बातमीदार) : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पालघर सरस विक्री व प्रदर्शन तसेच ग्लोबल कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद. पालघर येथे पत्रकार परिषद पार पडली. या वेळी १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत शिरगाव बीच, पालघर येथे हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव तसेच वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. पालघर सरस या विक्री व प्रदर्शनामध्ये पालघर जिल्ह्यातील सुमारे १०० टक्के स्वयंसहाय्यता महिला बचत गट सहभागी होणार आहेत. बचत गटांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, पारंपरिक उत्पादने तसेच आकर्षक व चविष्ट खाद्यपदार्थांची विक्री या प्रदर्शनात होईल. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीस ठरावीक जबाबदाऱ्या निश्चित करून त्या प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायती, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय हा या महोत्सवाच्या यशाचा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले, की हा महोत्सव कोकणातील कला, संस्कृती, उत्पादने आणि महिला बचत गटांच्या कर्तृत्वाला व्यापक व्यासपीठ देणारा आहे. या महोत्सवात साडेतीन ते चार लाख लोक उपस्थित राहतील, असा विश्वास आहे. वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनीही ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित करीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
---------
चौकट
सक्रिय सहभागाचे आवाहन
शिरगाव, सातनपाटी, केळवे, माहीम, सफाळे, एडवण, बोईसर, उमरोळी, मनोर, नांदगाव व तारापूर या ग्रामपंचायतींना महोत्सवाच्या यशासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. प्रसिद्धी, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था व इतर आवश्यक सुविधांबाबत समन्वयाने कार्य करण्याचे निर्देशही या वेळी देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.