बेकायदा फलकबाजीला चाप
वसई-विरारमध्ये पालिकेची १४४ ठिकाणी कारवाई
विरार, ता. १४ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई केली आहे. याअंतर्गत पालिकेने महिनाभरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फलक लावणाऱ्या १४४ ठिकाणी कारवाई करताना ४६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
महापालिका हद्दीत तात्पुरत्या जाहिरातींसाठी अधिकृत जागा उपलब्ध करून दिली आहे; मात्र तरीदेखील काही संस्था, संघटना, व्यावसायिकांकडून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या खांबांवर बेकायदा फलक लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जाहिरात विभागाने अशा फलकांवर निष्कासित करताना दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फलक, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई आहे. तसेच सार्वजनिक रस्ते वा पदपथांवर जाहिरात फलक लावल्यास महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा तसेच मुंबई पालिका अधिनियम कलम ३२८/३२८-अ आणि ४७१ अंतर्गत कारवाईचा इशारा जाहिरात विभागाचे दशरथ वाघेला यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.