मुंबई

सिडकोच्या पथकाला धक्काबुक्की

CD

सिडकोच्या पथकाला धक्काबुक्की
तळवलीत बेकायदा बांधकामावरील कारवाईला विरोध
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : घणसोलीतील तळवली परिसरातील बेकायदा बांधकामावर कारवाईसाठी गेलेल्या सिडकोच्या पथकाला जमावाने धक्काबुक्की केली होती. या प्रकरणात रबाळे पोलिस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवली येथील सर्व्हे क्रमांक ११०, ११२ परिसरातील बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी गुरुवारी (ता. १२) सकाळी सिडकोचे अनधिकृत बांधकामविरोधी पथक पोलिसांच्या बंदोबस्तात घटनास्थळी गेले होते. या वेळी इमारतीवर कारवाई सुरू होताच बांधकाम विकसकासह रहिवाशांच्या २० ते २५ जणांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. या वेळी सिडकोच्या पथकातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली गेली होती. तर काही आंदोलकांनी पेट्रोल ओतून पेटवण्याची धमकी दिली होती. या वेळी पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही जमाव पांगण्यास तयार नव्हता, उलट सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावत होता. त्यामुळे सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला कारवाईशिवायच माघारी परतले होते. या प्रकरणात रबाळे पोलिस ठाण्यात सिडकोकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी २०-२५ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, २२५, १८९ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: विजय आपलाच, पण त्याच्यापासून सावध राहा..., हरभजन सिंगचा भारतीय संघाला इशारा

Railway News: सामान्य डब्यांनाही एसीसारखी स्वच्छता असणार! भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ट्रेन प्रवासात ऐतिहासिक बदलाची नांदी

Mumbai News: अतिक्रमण काढण्यास महापालिका अपयशी, उच्च न्यायालयाचे ताशेरे; महापालिका आयुक्तांना आदेश

14,50,00,000 रुपये ! अभिषेक बच्चनची लक्झरी अपार्टमेंट विकून बक्कळ कमाई ; सिनेमे अपयशी पण बिझनेसमध्ये यश

Latest Marathi News Live Update : IND vs PAK सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीम सरावासाठी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर दाखल

SCROLL FOR NEXT