मुंबई

गावठी गुलाब लागवड ठरतेय सुगंधी यशोगाथा

CD

गावठी गुलाबातून चांगला नफा
शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीला आधुनिक बाजारपेठेची जोड

विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : वाकडूपाडा येथील तरुण शेतकरी शिवम मेहता यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक बाजारपेठेची जोड देत गावठी (देशी) गुलाब लागवडीतून यश संपादन केले आहे. सुगंधी, दर्जेदार आणि बाजारात चांगला भाव मिळणाऱ्या या गुलाबामुळे मेहता यांना चांगले उत्पन्न मिळत असून परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
शिवम मेहता यांनी आपल्या शेतात सुमारे ८०० ते ९०० देशी (गावठी) गुलाबांची झाडे लावली आहेत. या गुलाबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दरवळणारा नैसर्गिक सुगंध होय. बाजारात उपलब्ध असलेल्या हायब्रिड फुलांच्या तुलनेत गावठी गुलाबाचा सुगंध अधिक टिकाऊ व गडद असल्याने त्याला विशेष मागणी असते. सध्या त्यांच्या शेतातून दररोज सरासरी सहा ते सात किलो गुलाबांची तोड होते. हंगाम व मागणीप्रमाणे भावात चढ-उतार होत असला तरी सर्वसाधारणः गुलाबाला प्रति किलो २०० ते २५० रुपये दर मिळतो; मात्र सणवार, लग्नसराई किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या काळात हा दर ३०० ते ४०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतो. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास गुलाब शेतीतून चांगला नफा मिळू शकतो, असे मेहता सांगतात.
शिवम मेहता यांचा गुलाब प्रामुख्याने दादर फूल मार्केट येथे विक्रीसाठी पाठवला जातो. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत गावठी गुलाबाला कायम मागणी असल्याने विक्रीत अडचण येत नाही. व्यापाऱ्यांकडून थेट खरेदी होत असल्याने शेतमालाला योग्य दर मिळण्यास मदत होते. शिवम मेहता यांनी रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. नियमित छाटणी, पाणी व्यवस्थापन आणि कीडनियंत्रण यामुळे गुलाबाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले आहे. कमी क्षेत्रातही अधिक उत्पादन घेता येते, हे त्यांनी आपल्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. विक्रमगड तालुक्यातील अनेक तरुण शेतकरी शेतीत नवे प्रयोग करत असून गावठी गुलाब लागवड ही त्यातील एक यशस्वी दिशा ठरत आहे. सुगंधाने दरवळणाऱ्या या गुलाबामुळे तालुक्याची ओळख आता बाजारपेठेत वेगळी निर्माण होत आहे.

-----------
चौकट
गावठी गुलाबाला पसंती
गावठी गुलाबाचा उपयोग विविध प्रकारे केला जातो. या गुलाबापासून गुलाबजल आणि गुलकंद तयार केले जाते. तसेच देवपूजेसाठी, मंदिर सजावटीसाठी व विविध डेकोरेशनसाठी या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेष म्हणजे, गुलाबाच्या पाकळ्या सुकवून त्यांचा वापर स्वीट्स, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांमध्येही केला जातो. नैसर्गिक सुगंध व चव यामुळे ग्राहकांकडून गावठी गुलाबाला अधिक पसंती मिळते.

कोट
परंपरागत पिकांबरोबरच फुलशेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. बाजारपेठेचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनत असेल तर गावठी गुलाब लागवड फायदेशीर ठरते.
- शिवम मेहता, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT