मुंबई

अंबरनाथमध्ये भरदिवसा घरफोडी

CD

अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथ येथे भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने झोपेत असलेल्या तरुणाच्या घरातून तब्बल एक लाख सात हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना अंबरनाथ (पश्चिम) येथील चिंचपाडा परिसरातील कमलाकरनगर येथे घडली. मोहम्मद हारून फारूक खान (१८) हे ११ फेब्रुवारीला दुपारी घरात झोपले होते. मात्र, घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून एका अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केला. घराची झडती घेत तीन बॅगमध्ये ठेवलेली एकूण एक लाख सात हजार रुपयांची रोकड चोरून पसार झाला. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT