मुंबई

महाशिवरात्री निमित्त काशी विश्वनाथ मंदिराकडे उपहार सुपूर्द

CD

महाशिवरात्रीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिराकडे उपहार सुपूर्द
प्रभादेवी, ता. १४ ः महाशिवरात्री पर्वाचे औचित्य साधून प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास यांच्या वतीने भगवंत श्री विश्वेश्वर महादेवांसाठी पवित्र भेट उपहार श्रद्धापूर्वक पाठविण्यात आला. महाशिवरात्री या पवित्र पर्वानिमित्त श्री काशी विश्वनाथ मंदिर न्यास, वाराणसी यांनी सुरू केलेल्या विशेष नवकल्पनेअंतर्गत विविध प्रमुख तीर्थक्षेत्रांतून भगवंत श्री विश्वेश्वरांसाठी पवित्र भेटवस्तू व उपहार अर्पण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
याप्रसंगी सिद्धिविनायक न्यासाकडून डॉ. संदीप राठोड, उपकार्यकारी अधिकारी प्रशांत मणेरीकर तसेच ज्येष्ठ पुजारी यांच्या हस्ते ही पवित्र भेट विधिवतरीत्या सुपूर्द करण्यात आली. महाशिवरात्री या महापर्वानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेतून श्री गणेश आणि श्री महादेव यांच्यातील पवित्र पिता-पुत्र संबंधाची आध्यात्मिक भावना अधोरेखित करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे श्री क्षेत्र काशी, वाराणसी आणि प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर यांच्यातील धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक एकात्मता अधिक दृढ झाल्याचे सांगण्यात आले. भाविकांसाठी हा कार्यक्रम भक्ती, समरसता आणि आध्यात्मिक परंपरेला जोडणारे पावन माध्यम ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Peshwa Descendants : पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत? कशी आहे त्यांची आत्ताची परिस्थिती..पाहा इतिहासातून वर्तमानाचा उलगडा

बाबर आझम जर तुमचा प्रमखु खेळाडू असेल...; भारताच्या माजी कर्णधाराने केला पाकिस्तानचा अपमान! म्हणाले, भारताची 'C' टीम यांना हरवेल

लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी ६; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Vaibhav Suryavanshi 10th Exam : वैभव सूर्यवंशी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही; जाणून घ्या त्यामागचं कारण...

SCROLL FOR NEXT