मुंबई

नवी मुंबईत ‘बायोझेस्ट’ क्रीडा स्पर्धा

CD

नवी मुंबईत ‘बायोझेस्ट’ क्रीडा स्पर्धा
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) : डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठच्या स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मॅटिक्सतर्फे ‘बायोझेस्ट’ क्रीडा स्पर्धा १० व ११ फेब्रुवारी रोजी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडांगण येथे उत्साहात झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, तंदुरुस्ती व संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित स्पर्धांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॉक्स क्रिकेट, बुद्धिबळ, शॉटपुट, गोळाफेक, रस्सीखेच आदी प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. नवी मुंबई वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त तथा महाराष्ट्र केसरी विजेते कुस्तीपटू विजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. देवजानी दास गुप्ता, डॉ. भक्ती महात्रे व डॉ. सुभाष कुडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी झाल्या.
प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून ते ध्येय गाठण्यासाठी परिश्रम घ्या. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःच्या शरीराला खेळाची, वयामाची सवय लावून त्याची आवड निर्माण करा . कोणतेही ध्येय गाठताना आपल्या आई-वडिलांना विसरू नका, असे याप्रसंगी बोलताना सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार! मिठी नदीवर नवा उड्डाणपूल उभारणार; मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Viral: ६ बायका, ९५० स्क्रू आणि १५ महिने मेहनत... प्रसिद्ध इंफ्लुएसरनं लाखो खर्चून तयार केला लाखोंचा 'सुपर बेड', कारण...

Pune News : राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हृदयविकार उपचार केंद्रांची उभारणी; १०० कोटींचा निधी मंजूर

Weekly Love Astrology Predictions: धन अन् बुधादित्य राजयोगाची कमाल! मिथुनसह ‘या’ 5 राशींना मिळणार मोठं यश

Pune News : पुणे महापालिकेत नेमकं काय घडतंय? मिळकतकरासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे; फाइल्स गायब, चुकीची माहिती, जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT