मुंबई

बोरघाटात अवजड पाईप वाहतूक करणारा टेम्पोचे ब्रेक निकामी.

CD

बोरघाटात तिहेरी अपघात
खालापूर, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील बोरघाटात शुक्रवारी (ता. १३) रात्री एका अवजड लोखंडी पाईपची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या घटनेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून कोन चारचाकीमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
खंडाळाकडून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो अंडा पॉईंट दरम्यान आल्यानंतर ब्रेक निकामी असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने समयसूचकता दाखवत टेम्पो खोपोलीकडे जुन्या मुंबई राष्ट्रीय महामार्गाकडे वळवला. या ठिकाणी अवजड वाहनांना बंदीसाठी हाईट बॅरियर उभारण्यात आले आहे. टेम्पोची केबिन हाईट बॅरिअरला धडकल्याने केबिनचा चक्काचूर झाला. टेम्पो वेगात आदळल्याने टेम्पोतील पाईप फेकले जाऊन बाजूला असलेल्या दोन चारचाकींवर आदळले. अपघातानंतर टेम्पो चालक केबिनमध्ये अडकून बसल्याची माहिती बोरघाट पोलिसांना मिळाल्यानंतर बोरघाट पोलिस मदत केंद्र, आयआरबी पेट्रोलिंग, हेल्प फाउंडेशन, डेल्टा फोर्स तातडीने मदतीसाठी पोहचले. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी चालकाला तातडीने उपचाराकरता लोकमान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चारचाकीमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. क्रेनच्या साहाय्याने लोखंडी पाईप आणि टेम्पो हटवण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

**फोटो- अपघात ग्रस्त वाहन आणि जखमी टेम्पो चालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan controversy: "भाजपाला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता..."; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले पुरावे, राज्यात खळबळ!

पुण्यात भाजपचा राडा, आंदोलकांची दगडफेक; महिला जखमी, पोलीस सामिल असल्याचा काँग्रेसचा आरोप

Mumbai: मोदी-मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क; १३ तास वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर प्रवेशबंदी

Viral Video : फुटपाथवर स्कूटरस्वाराला धडा शिकवणाऱ्या वृद्ध महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पण यावेळी... पाहून तुम्हीही कौतुक कराल

अजून शेवट बाकी ! असा प्रसारित होणार पारूचा अखेरचा एपिसोड; महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT