मुंबई

डोणवत येथे महिलेचा विनयभंग. त्रेपण्ण वर्षीय इसमावर गुन्हा दाखल.

CD

डोणवत येथे महिलेचा विनयभंग
खालापूर (बातमीदार) ः एका ३१ वर्षीय महिलेला अश्लील हातवारे करून तिचा पाठलाग करत घराचा दरवाजा ठोठावून विनयभंग केल्याची घटना खालापूर तालुक्यातील वडवळ धवली येथे घडली आहे. याप्रकरणी सुभाष चाळके (वय ५३) याच्याविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही आरोपी सुभाष चाळके याच्याच गावात राहते. गुरुवारी (ता. १२) दुपारी पीडिता आपल्या घरासमोरील अंगणात एकटी उभी होती. यावेळी सुभाष चाळके तेथे आला आणि तुझ्या घरात कोणीही नाही, मी आत येऊ का? असे विचारून त्याने अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने तातडीने घरात धाव घेऊन दरवाजा आतून बंद केला. मात्र, सुभाषने घराचा दरवाजा मोठमोठ्याने ठोठावण्यास सुरुवात केली. दरवाजा उघडा, मला आतमध्ये यायचे आहे, असे ओरडून त्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पीडितेने खालापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुभाष चाळकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: आज एक नाही, तर भारत-पाकिस्तानचे दोन T20 सामने; कधी आणि कुठे पाहाणार? जाणून घ्या

Bengaluru Car Accident : बंगळुरुत आणखी एक भीषण अपघात ! भरधाव कार दुभाजक ओलांडून बसला धडकली, पाच जणांचा जागीच मृत्यू

Pune News: माहोल तोच, फक्त अजितदादांच्या जागी सुनेत्रावहिनी; बारामतीतील जनता दरबारात निवेदनांवर जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना!

Ind vs Pak T20 World Cup: तर पाकचा आश्चर्यकारक विजय... आजचा सामना कोण जिंकेल? अभिषेक शर्मा किती धावा काढेल? मॅचपूर्वी मोठं भाकीत समोर

PM Kisan Update: माेठी बातमी! एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित; पीएम किसान सन्मान निधी योजना, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT