मुंबई

हरवलेले ८३ मोबाईल मालकांना परत

CD

कळवा, ता. १४ (बातमीदार) : कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२५-२०२६ या कालावधीत हरवलेल्या मोबाईल प्रकरणांचा यशस्वी छडा लावत कळवा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध तक्रारींच्या अनुषंगाने सुमारे १२ लाख ४७ हजार रुपये किमतीचे एकूण ८३ मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात यश मिळाले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर व वरिष्ठ निरीक्षक (गुन्हे) अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने या प्रकरणांचा तपास केला. हरवलेल्या मोबाईलची माहिती सीईआयआर पोर्टलवर नोंदवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तींचे पत्ते शोधून कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला आणि त्यानंतर संबंधित मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई परिमंडळ १चे पोलिस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे; तसेच कळवा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक विठ्ठल नावडे, सुनील पुंगळे आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. कळवा पोलिसांच्या या कार्यामुळे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT