उलवेत शिवजयंती जल्लोष
भव्य मिरवणूक, शाहिरी कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती
उलवे, ता. १४ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उलवे नोड येथे १९ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक आणि शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, गव्हाण यांच्या वतीने सकाळी ८.३० वाजता गव्हाण येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील रामशेठ ठाकूर मैदानात समारोप होणार आहे. ढोल-ताशे, भगवे ध्वज आणि शिवजयघोषाने परिसर दुमदुमणार असून शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध शाहिर चंद्रकांत माने व ऋतुराज माने आपली कला सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
या सोहळ्यास रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी तसेच जे. एम. म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवरायांचे विचार व स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.