मुंबई

किरकोळ वादातून तरुणाला मारहाण

CD

अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : रस्त्यावरून चालण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर दगडाने हल्ला आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अंबरनाथ येथे घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
अंबरनाथ पूर्व येथील शिवाजी महाराज चौकाजवळील बॉम्बे बारसमोर १३ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओमप्रकाश शर्मा (वय ३८, रा. कुर्ला कॅम्प, उल्हासनगर) व त्यांचे मित्र दत्तात्रय फटांगरे (वय ३९) हे दोघे पायी घरी जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने सतत हॉर्न वाजवत बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्यासमोर दुचाकी आडवी लावून ‘रस्त्याच्या कडेला चालता येत नाही का?’ असे म्हणत वाद घातला. किरकोळ कारणावरून सुरू झालेली बाचाबाची पुढे हाणामारीत बदलली. दत्तात्रय फटांगरे यांच्या डोक्यात त्या व्यक्तीने दगडाने प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच शर्मा यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की व ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय तीक्ष्ण वस्तूने शर्मा यांच्या डाव्या कानाजवळ वार करून दुखापत केली. मारहाणीनंतर ती व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाली. याप्रकरणी शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संशयित आरोपी अंदाजे २८ ते ३० वयोगटातील, काळा-सावळा वर्णाचा व दाढी वाढवलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक रवींद्र भवारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT