मुंबई

ग्रामस्थांच्या लोकसहभागातून पाणीपुरवठा योजनांचे सशक्त संचालन

CD

सशक्त ग्राम, सशक्त पाणीपुरवठा
समुदायाच्या नेतृत्वाखाली शाश्वत जलसुरक्षेकडे वाटचाल

पालघर, ता. १५ (बातमीदार) : जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करत ग्रामस्थांचा लोकसहभाग अधिक दृढ करण्यासाठी जिल्ह्यात ‘जल अर्पण दिन’ साजरा करण्यात येत आहे. सोमवारी (ता. १६) नागझरी व पेठ ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतींमध्ये ‘जल अर्पण दिन’ उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी, शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जलजीवन मिशनअंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. ज्या गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या आहेत, त्या योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येत आहेत. नागझरी व पेठ तवा या गावांतील पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याने सोमवारी अधिकृत हस्तांतरण प्रक्रियेसह ‘जल अर्पण दिन’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येईल. योजनेचे नियमित संचालन, देखभाल व दुरुस्ती यासाठी ग्रामस्थांकडून सामूहिक जबाबदारीची हमी घेतली जाणार आहे. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गावातून जनजागृती रॅली, जल प्रतिज्ञा व शुद्ध पाण्याच्या घोषणांसह मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहे.
----------------
एफ.टी.के.चे प्रात्यक्षिक
तसेच शुद्ध पाण्याच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एफ.टी.के. (फिल्ड टेस्ट किट)चे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमात महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व गावांनी जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करत ‘जल अर्पण दिन’ साजरा करून लोकसहभाग अधिक बळकट करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT