मुंबई

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर;

CD

नागरिकांची सुरक्षा धोक्यात
वासुंद्री रस्त्यावरील सीसीटीव्ही अनेक महिन्यांपासून बंद
टिटवाळा, ता. १६ (वार्ताहर) : शहरातील वाढती गुन्हेगारी आणि वर्दळ लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांचे महत्त्वाचे अस्त्र मानले जातात; मात्र टिटवाळा पश्चिमेतील अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वासुंद्री रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वासुंद्री रस्त्यावरील पंचवटी चौक, ज्ञानेश्वर मंदिर परिसर आणि महाकालेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा भाग अत्यंत गजबजलेला असतो. या ठिकाणी बसवलेले कॅमेरे सध्या केवळ नावापुरते आहेत. चोरी, छेडछाड किंवा अपघातासारख्या घटना घडल्यानंतर पोलिसांना तपासासाठी फुटेज मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांचे फावते आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.

यासंदर्भात स्मार्ट सिटी विभागाच्या मेंटेनन्स विभागातील प्रमोद कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, मी माहिती घेऊन कळवतो, असे मोघम उत्तर त्यांनी दिले. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्मार्ट सिटीच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

पोलिस गस्त वाढवण्याची मागणी
टिटवाळा वासुंद्री रस्ता परिसरातील सुरक्षेची स्थिती अत्यंत चिंताजनक असून, पंचवटी चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. या कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ज्ञानेश्वर मंदिर परिसरातील कॅमेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाने त्यांची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. याशिवाय वासुंद्री रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याने चोऱ्या आणि इतर गुन्हेगारी रोखण्यासाठी या भागात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT