महाशिवरात्रीनिमित्त नवी मुंबई भक्तिमय
रुद्राभिषेक, महारुद्र, भजन-कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम; सामाजिक संस्थांकडून जलदान, फराळवाटप
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई व पनवेल परिसरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील पावणे गावातील पावनेश्वर मंदिर, कोपरखैरणे येथील चिकनेश्वर मंदिर, सेक्टर १९ मधील डुगेश्वर शिवमंदिर, वाशीतील जागृतेश्वर मंदिर तसेच बामणदेव मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीपासूनच मंदिरांबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रुद्राभिषेक, पारायण, महारुद्र, होमहवन, भजन-कीर्तन आणि महाआरतीमुळे संपूर्ण वातावरण ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. पावनेश्वर मंदिराची आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई विशेष लक्षवेधी ठरली. मंदिर परिसरात धार्मिक साहित्याची दुकाने, खेळण्यांचे स्टॉल आणि भाविकांची मोठी गर्दी यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. सामाजिक संस्थांतर्फे मोफत जलदान व साबुदाणा खिचडी, फराळाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, नेरूळ येथील माता अमृतानंदमयी मठ येथे दिवसभर विविध वेळी शिवअभिषेक, महामृत्युंजय होम, हवन, भजन, सत्संग, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
चौकट
अखंड हरिनाम सप्ताहामुळे भक्तीमय वातावरण अधिक गहिरे
महाशिवरात्रीनिमित्त अनेक मंदिरांमध्ये सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात दररोज भजन-कीर्तन, प्रवचन आणि नामस्मरण झाले. त्यामुळे केवळ एका दिवसापुरता उत्सव न राहता संपूर्ण आठवडाभर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांतील भाविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला, ही या उत्सवाची विशेष बाब ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.